
अमेरिकेत एप्रिल 2000 मध्ये एका वृत्तपत्राच्या महिला कर्मचाऱ्याचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील कथित आरोपीला दक्षिण अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात लिथिएम इंजेक्शन देऊन मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. या वर्षी फ्लोरिडामध्ये फाशी देण्यात येणारा हा तिसरा आणि अमेरिकेत 11 वा आरोपी होता.
एप्रिल 2000 मध्ये द मियामी हेराल्ड या वृत्तपत्राची महिला कर्मचारी जेनेट अकोस्टा (49) या जेवणासाठी गेल्या असताना त्यांचे अपहरण झाले. मायकेल टांझी असे अपहरण कर्त्याचे नाव आहे. मायकेलने अकोस्टा त्यांच्या व्हॅनमध्ये जेवत असताना त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना एटीएम मशीनमधून पैसे काढण्यास भाग पाडले. याचदरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर त्याने तिचा मृतदेह फेकून दिला. .
जेनेट अकोस्टा यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. याचौकशीदरम्यान टांझी याने अकोस्टा याच्या हत्येची कबुली दिली. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने टांझीला सिरीयल किलर म्हणून घोषित केले. आणि 2003 मध्ये त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, टांझी यांला लिथिएम इंजेक्शन देऊन फाशी देण्यात आली. मात्र यापूर्वी टांझी यांच्या वकिलाने टांझीच्या अति लठ्ठपणामुळे त्याला अधिक त्रास होऊ शकतो, असा युक्तिवाद करून त्याची फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून टांझीला अखेर फाशीची शिक्षा सुनावली. रायफोर्ड येथील फ्लोरिडा राज्य कारागृहात तेथील वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता फाशी देण्यात आली.
या आठवड्यात अमेरिकेत होणाऱ्या दोन फाशींच्या शिक्षकांपैकी ही एक शिक्षा आहे. 2004 मध्ये कर्तव्यावर नसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आरोपी मिकल महदीला शुक्रवारी दक्षिण कॅरोलिनामध्ये फायरिंग स्कॉ़ड यापथकाद्वारे फाशी देण्यात येणार आहे. या वर्षी दक्षिण कॅरोलिनामध्ये फायरिंग स्कॉ़ड पथकाने फाशी दिलेला महदी हा दुसरा व्यक्ती असेल. तर गेल्या वर्षी अमेरिकेत 25 जणांना फाशी देण्यात आली.