
महाराष्ट्र राज्य लॉन संघटनेच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पीएमडीटीए यांच्या सहकार्याने बिली जीन किंग कप 2025 आशिया ओशनिया गट 1 महिला टेनिस स्पर्धेत पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघाने सुहाना भारत संघाचा 2-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी पहिल्या एकेरीच्या लढतीत हिंदुस्थानच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्तीने न्यूझीलंडच्या ऐशी दासचा 6-1, 6-1 असा पराभव केला. दुसऱ्या एकेरीच्या लढतीत न्यूझीलंडच्या जागतिक क्रमवारीत 45 व्या स्थानी असलेल्या लुलू सून हिने हिंदुस्थानच्या सहजा यमलापल्लीचा 6-3, 6-3 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत न्यूझीलंडच्या लुलू सून व मोनिकू बेरी यांनी हिंदुस्थानच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे यांचा 3-6, 4-6 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.