चिंता करू नका पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गॅस दरवाढ कमी करू, राष्ट्रवादीचे सरकारला खुले पत्र

‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे. चिंता करू नका, पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गॅस दरवाढ कमी करू. तुमचं लाडपं, महागाईच्या गोदीत बसलेलं मोदी सरकार,’  असे खुले पत्र लिहीत राष्ट्रवादी काँग्रेसने गॅस सिलिंडरच्या दरात केलेल्या 50 रुपयांच्या वाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला.

पत्रात काय म्हटलेय

‘प्रिय देशवासीयांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतीची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. महागाईची धग निमूटपणे सहन करा. ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे,’ हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच. चिंता करू नका. पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू व सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.’