इमोजीच्या वादातून केला विनयभंग

व्हॉट्सअॅप ग्रूपवर इमोजी पाठवल्याच्या वादातून मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

पीडित मुलगी ही वांद्रे येथे राहते. ती एका महाविद्यालयात शिकते. त्या महाविद्यालयात शिकणाऱया मुलांचा व्हॉट्सअॅप ग्रूप आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात मुलगी घरी होती. तिच्या परिचित असणाऱया एकाने तिला कॉल, आणि चॅट केले होते. त्यात तिच्या वर्गातील मुलाच्या शाळेच्या ग्रूपवर एक इमोजी पाठवला. त्याला तिने उलटी झाल्याचा रिप्लाय दिला. त्यावरून वाद झाला. वादानंतर त्याने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर मुलीने निर्मल नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला.