
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया रिक्षाचालकाला मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
पीडित मुलगी ही मालाड परिसरात राहते. त्याच परिसरात अटक आरोपी राहतो. तो गेल्या काही दिवसांपासून मुलीला विविध कारणे सांगून त्याच्या घरी आणून तो तिच्यासोबत अश्लील कृत्य करत होता. हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून तो तिला धमकावत होता. भीतीपोटी तिने तो प्रकार कोणालाही सांगितला नाही. नुकतेच मुलीने याची माहिती कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्याला मालवणी पोलिसांनी अटक केली.