अमेरिकेने चीनवर लावला 104 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांच्या निर्णयाचा चीनला मोठा फटका

टॅरिफवरून सुरू झालेला अमेरिका व चीनमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीए. अमेरिकेने आता चीनवर तब्बल 104 टक्के टॅरिफ लावणार असल्याचे जाहीर केले आहे. हे नवीन टॅरिफ 9 एप्रिलपासून लागू होणार आहे. व्हाईट हाऊसकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.