
प्रियांश आर्याने आपल्या तोडफोड फलंदाजीने महाराजा यादवसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हादरवून सोडलं. 42 चेंडूंत 9 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 103 धावा त्याने चोपून काढल्या. त्यामुळे पंजाबने 220 धावांच आव्हान चेन्नईला दिलं होतं. परतुं आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरली. रचिन रविंद्र (36) आणि डेव्हिड कॉन्वे (69) यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. महेंद्र सिंग धोनीकडून संघाला विजयाची अपेक्षा होती परंतु 12 चेंडूंमध्ये 27 धावा करत थला माघारी परतला आणि चेन्नईला सलग चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.