
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील शेअर बाजारात भूकंप झाला आहे. हिंदुस्थानचा शेअर बाजारही सोमवारी भूआसपाट झाला होता. त्यामुळे एका दिवसता गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंगळवारी बाजाराची काय दिशा असेल, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता होती. सोमवारी बाजार बंद होण्याआधी काही काळ किरकोळ तेजी दिसून आली. त्यामुळे आजच्या बाजाराकडून गुंतवणूकदारांना अपेक्षा आहेत.
मंगळवारी प्रि ओपन मार्केटची सुरुवात चांगल्या तेजीने झाली. त्यामुळे बाजार सावरण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत होते. मात्र, ही तेजी फार काळ टिकली नाही. सुरुवातीच्या काही मिनिटातच बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 900 अंकावर सुरु झाला तर निफ्टीमध्ये सुमारे 200 अंकांची तेजी दिसून आली. त्यानंतर दोन्ही इंडेक्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे बाजारात अनिश्चततेचे वातावरण कायम आहे.
प्रि ओपन मार्केटनंतर 9.15 वाजता व्यवहार सुरू होताच निर्देशांकांने पुन्हा उशळी घेतली आणि मुंबई शेअर बाजाराची सुरुवात 74,330 ने झाली. त्यानंतर बाजारात किरकोळ घसरण होत तो 74,211.62 वर म्हणजे सुमारे 1073.72 अंकाच्या 1.47 % वाढीसह व्यवहार करत आहे. तर निफ्टीची सुरुवात 22,446.75 अंकांवर झाली. तर तो 356 अंकांच्या म्हणजे 1.61% वाढीसह 22,517.60 वर व्यवहार करत होता.
प्रि मार्केटमध्ये तेजी, नंतर घसरण पुन्हा बाजाराची सुरुवातीला उसळी त्यानंतर पुन्हा थोजी घसरण अशी सध्या बाजाराची स्थिती दिसत आहे. त्यामुळे अजूनही बाजारात अनिश्चतता असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या घसरणीनंतर बाजार थोडासा वर जात असल्याने हे सकारात्मक आहे. मात्र, दुपारनंतर जागतिक शेअर बाजार सुरू झाल्यावर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.