मोदी-शहांच्या लाडक्या उद्योगपतींना देश विकला जातोय,उद्या हिंदुस्थानातही लोक रस्त्यावर उतरतील

अमेरिका एलॉन मस्क यांना विकली जात आहे, तसा हिंदुस्थानही नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जात आहे. धारावी झोपडपट्टीपासून वक्फ बोर्डाच्या जमिनींपर्यंत सर्व काही अदानींच्या घशात घातले जात आहे. त्यामुळे अमेरिकेप्रमाणे हिंदुस्थानातील लोकही उद्या क्रांतीचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा गंभीर इशारा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना दिला. सद्यस्थिती पाहिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 2025 चा काळ पूर्ण करतील किंवा नाही याविषयी आपल्या मनात शंका आहे असेही ते म्हणाले.

उद्या भाजपचे लोक बोधगयेवर दावा करतील, चैत्यभूमीवरही दावा सांगतील, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली. अमेरिकेत मस्क याचा सरकारमधील हस्तक्षेप वाढल्याने जनता रोष व्यक्त करत आहे. कदाचित जनता व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पना फटकावू शकते आणि भविष्यात हिंदुस्थानातही तसाच प्रकार घडू शकतो, असे खासदार राऊत म्हणाले.