बायकोच्या सल्ल्यामुळे सुंदर पिचाईंना फायदा

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना बायकोचा सल्ला ऐकल्यामुळे मोठा फायदा झाला आहे. सुंदर पिचाई यांच्या पत्नीचे नाव अंजली पिचाई असे आहे. ती मूळची राजस्थानची आहे. अंजलीने 1993 साली आयआयटी खरगपूरमधून केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचदरम्यान अंजलीची भेट सुंदर पिचाई यांच्याशी झाली. आधी मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अंजली सध्या फायनान्शियल सॉफ्टवेयर कंपनी इंटूटमध्ये कार्यरत आहे.

अंजलीसोबत लग्न झाल्यानंतर सुंदर पिचाई हे गुगलमध्ये काम करत होते. त्या वेळी त्यांना जगातील मोठमोठ्या कंपन्यांकडून ऑफर यायला सुरुवात झाली. गुगल कंपनी सोडावी की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत होते. त्या वेळी पत्नी अंजलीने सुंदर यांना गुगल न सोडण्याचा सल्ला दिला. बायकोच्या सल्ल्यानंतर सुंदर पिचाई यांनी गुगलमध्ये नोकरी करणे पसंत केले. सुंदर पिचाई सध्या हिंदुस्थानातील सर्वात जास्त पगार मिळवणारे सीईओ आहेत.