शनिवारी दिसणार ‘पिंक मून’

खगोलप्रेमींसाठी हा आठवडा आनंदाचा असणार आहे. 12 एप्रिल रोजी आकाशात पिंक मून दिसणार आहे. शनिवारी हिंदुस्थानी वेळेनुसार, सकाळी 5 वाजून 52 मिनिटांनी आकाशात पिंक मून दिसणार आहे. या चंद्राचे नाव गुलाबी चंद्र (पिंक मून) असे असले तरी हा चंद्र खरोखर गुलाबी दिसत नाही. याला उत्तर अमेरिकेत वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या ‘क्रिपिंग फ्लॉक्स’ नावाच्या गुलाबी फुलावरून त्याला हे नाव मिळाले आहे. हे फूल नवी सुरुवात आणि वसंत ऋतूतील ताजेपणाचे प्रतीक मानले जाते.