
शाहरुख खान पत्नी आणि मुलांसह नव्या घरात शिफ्ट झाला आहे. मुंबईतील पाली हिल या ठिकाणी हे घर आहे. वांद्रे येथील मन्नत घराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत शाहरुख खान या ठिकाणी राहणार आहे. हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट एकूण 10 हजार 500 फुटांचे आहे. शाहरुख नव्या घरासाठी दर महिना 24 लाख रुपये मोजणार आहे. हे घर चित्रपट निर्माता वासू भगनानी यांच्या मालकीचे आहे.