
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अक्षय शिंदे याच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. सरकारनेच एन्काउंटरच्या नावाखाली खून केला, बळी मात्र पोलिसांचा गेला, असं ते म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.
X वर केलेल्या पोस्टवर रोहित पवार म्हणाले की, “अधिकाऱ्यांनी सरकारच्या हातचं बाहुलं बनून चुकीचं काम केलं तर, कशी आफत ओढवते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश. अक्षय शिंदे याला कायद्याने शिक्षा होणं अपेक्षित असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनेच पोलिसांकरवी कायदा हातात घेऊन एन्काउंटरच्या नावाखाली त्याचा खून केला. आता बळी मात्र पोलिसांचा गेला. यावरून पोलीस असो किंवा इतर सरकारी अधिकारी यांनी योग्य धडा घ्यावा आणि सरकारचा होयबा न बनता नियमानुसारच काम करावं, अन्यथा आतासारखी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही.”
अधिकाऱ्यांनी सरकारच्या हातचं बाहुलं बनून चुकीचं काम केलं तर कशी आफत ओढवते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश. अक्षय शिंदे याला कायद्याने शिक्षा होणं अपेक्षीत असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनेच…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 7, 2025