Pumice Stone Benefits- तुमच्या पायांनाही पडतात का भेगा? हा एक साधा सोपा उपाय नक्की करुन पाहा 

आपल्या शरीरातील प्रत्येक भागाचे स्वतःचे असे महत्त्व आहे. चेहरा आणि हात या अवयवांची आपण काळजी घेतो. परंतु पावलांकडे आपले कायम दुर्लक्ष झालेले आहे. पायांना पडलेल्या भेंगामुळे अनेकदा चालतानाही खूपच त्रास होतो. अशावेळी घरगुती साधे सोपे उपाय करून आपण पायाच्या भेंगापासून आराम मिळवु शकतो.

पावलांवरील मृत त्वचा निघून, त्याजागी नवीन त्वचा येण्यास मदत होते. पावसाळ्यांमध्ये पायांना खूप मोठ्या प्रमाणात भेगा पडतात. त्यामुळे अगदी घरच्या घरी करू शकतो असा साधा सोपा उपाय.

प्युमीस स्टोन

प्युमीस स्टोन म्हणजे पाय घासण्यासाठीचा दगड. असा दगड आपल्याला कुठेही सहजरीत्या उपलब्ध होईल. पूर्वीच्या काळी गावी दगडाने घासूनच अंघोळ केली जायची. तसाच हा प्युमीस स्टोन. प्यूमीस स्टोन एक दगड आहे जो आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतो. या दगडाच्या मदतीने आपण आपल्या जाड आणि मृत त्वचेला स्वच्छ करू शकतो. तसेच या दगडाचा वापर हा स्क्रबिंग, तसेच फुटलेल्या टाचांसाठी प्रामुख्याने करता येतो. या दगडामुळे ड मृतपेशी काढून टाकण्यास खूप मदत होते. त्यामुळे टाचांवर केवळ हा दगड घासल्यावरच आपल्याला आराम प्राप्त होतो.

सर्वप्रथम, बादली किंवा टबमध्ये पाणी ओतून आपल्या पावलांना घोट्यापर्यंत चांगले भिजवावे. त्यानंतर टबमधील पाण्यात शॅम्पू घालावा आणि थोडा शॅम्पू पायांना चोळावा. पाण्यात काही काळ पाय भिजवून ठेवावेत, त्यानंतर प्युमीस स्टोनने आपले पाय नीट घासून काढावेत. त्यानंतर आपण 1 चमचे मीठ, 1 चमचे ऑलिव्ह ऑईल यांचे मिश्रण करून पायांवर घासावे. किमान तीन दिवस हा उपाय सलग करा, तुम्हाला नक्की आराम मिळेल.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा.)