
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना एका व्यक्तीच्या संशयित हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या पिशवीत ब्राऊन हेरॉईनच्या 15 पुड्या सापडल्या. पोलिसांनी 15 पुड्या आणि दुचाकी असा मिळून 77 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना त्यांना जयस्तंभ येथे आदिल अश्रफ शेख (वय 30 रा.गोळप सडा) हा एका दुचाकीवरून बसून संशयित हालचाली करताना आढळून आला.पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या पिशवीत ब्राऊन हेरॉईनच्या 15 पुड्या सापडल्या.पोलिसांनी आदिल अश्रफ शेखला अटक करत शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.त्यांची दुचाकीही जप्त केली.ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस हवालदार शांताराम झोरे,बाळू पालकर,दीपराज पाटील आणि गणेश सावंत यांनी केली.