
‘पार्टी पठान के घर पे रखोगे तो मेहमान नवाजी के लिए पठान तो आएगा और पटाखे भी लाएगा’ 2023 मध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण या दोघांचा पठाण सुपरहिट ठरला. ‘पठाण’ गाजला तो त्यातील संवादांमुळे म्हणूनच आजही ‘पठाण’मधले कित्येक संवाद आपल्या प्रत्येकाच्या ओठी आहेत. ‘हम ना किसी माँ के लाडले हैं, ना किसी के बाप के नौकर, अपनी मर्जी से काम करते हैं, अपनी कीमत पर’, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ हे संवाद आजही तितकेच लोकप्रिय आहेत.
शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण-2’ येणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील वर्षी ‘पठाण-2’ चे शूटिंग सुरु होणार असल्याची माहिती नुकतीच मिळालेली आहे. शाहरुख आणि दीपिकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ‘पठाण-२’ च्या शूटिंगला विलंब होत असल्याचे समजते.
‘पठाण-2’ येत असल्याचे वृत्त नुकतेच यशराज फिल्म्स यांच्याकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. 2023 मध्ये पठाणने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई करून, तिकीटबारीवर स्वतःचा दबदबा निर्माण केला होता.
‘पठाण-2’ मध्ये शाहरुख खान आणि दीपिका आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आगामी सिक्वेलमध्ये अधिकाधिक रोमांचक आणि साहसी दृश्यांचा भरणा असणार आहे. याकरता आदित्य चोप्रा यांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे.
सध्याच्या घडीला शाहरुख खान हा सुहाना खान म्हणजेच त्याच्या लेकीसोबत एका चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव ‘किंग’ असे आहे. त्यामुळेच शाहरुखला या वर्षी शूटींगसाठी अजिबात वेळ नाही. म्हणूनच ‘पठाण-2’ चे शूटींग हे पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार आहे. दीपिका सुद्धा यावर्षी दोन चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या दोघांच्या तारखांसाठीच ‘पठाण-2’ चे शूटींग हे पुढच्या वर्षी करण्याचे ठरवलेले आहे. ‘पठाण-2’ ची पटकथा ही तयार असून, आता फक्त शूटींग सुरु होण्यासाठी टीमकडून वाट बघण्यात येत आहे.