Chhaava- ‘छावा’तील औरंगजेबाची स्वारी निघाली दक्षिणेकडे!

‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेतून अक्षय खन्नाने बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांनंतर पुनरागमन केले होते. अक्षयच्या चाहत्यांसाठी ही बाब खरोखर सुखावणारी होती. ‘छावा’मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच चीड निर्माण केली होती. अक्षयने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेने सर्वांकडूनच वाहवा मिळवली होती. मुख्य बाब म्हणजे, छावा या चित्रपटाने कमाईदेखील अतिशय सुसाट केली आहे. आता ही ‘छावा’तील औरंगजेबाची स्वारी आता दक्षिणेत निघालेली आहे.

अक्षय खन्ना आता त्याचे अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दाक्षिणात्य सिनेमामध्ये काम करताना दिसणार आहे. अक्षय खन्ना दक्षिणेतील पौराणिक सुपरहिरो चित्रपट ‘महाकाली’ मध्ये दिसणार आहे. मुख्य म्हणजे हे अधिकृत वृत्त असून, तरण आदर्शने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत.

महाकाली चित्रपटामध्ये अक्षय कोणती भूमिका साकारणार याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळेच आता महाकाली कधी अवतरणार, त्यानंतर अक्षयची नेमकी भूमिका काय आहे हे पाहणेच उचित ठरणार आहे.
सध्याच्या घडीला कळलेल्या माहितीनुसार, अक्षयच्या ‘महाकाली’ मधील पात्रावर काम सुरु आहे.

दाक्षिणात्य कोणत्याही चित्रपटावर ही संशोधनाची मेहनत ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. केवळ कास्टिंगवर उत्तम संशोधन होत नाही. तर चित्रपटातील सर्व बाजूंचे उत्तम संशोधन करुनच दाक्षिणात्य सिनेमा हा तयार केला जातो. त्यामुळेच सध्या अक्षय खन्नाच्या पात्राविषयी फार कुठलीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतही छावातील औरंगजेबाचा बोलबाला सुरु झाला आहे. येत्या काही दिवसात अक्षय खन्ना अजून दाक्षिणात्य सिनेमात भूमिका करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.