जास्त विचार करत नाही, टप्प्यात आला की कार्यक्रम पक्का! जुनं ट्विट आठवत राहुल पिटरनसला भिडला, व्हिडीओ व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगमध्ये ‘लखनऊ’ सोडून ‘दिल्ली’ला शिफ्ट झालेल्या केएल राहुलची बॅट चांगलीच तळपत आहे. याचा थेट फायदा दिल्ली कॅपिटल्स संघालाही होत आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने 3 पैकी 3 सामने जिंकत गुणतालिकेत पहिला नंबर पटकावला आहे.

दिल्लीच्या शत प्रतिशत विजयी रेकॉर्डमध्ये केएल राहुलचाही मोठा वाटा आहे. 14 कोटी रुपये मोजून दिल्लीने त्याला आपल्या ताफ्यात घेतले असून त्याने पैसा वसूल खेळी केली आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने 51 चेंडूत 77 धावा फटकावल्या. तीन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. या सामन्यानंतर राहुल आणि दिल्लीचा मेंटॉर केविन पिटरसन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना संपल्यानंतर केएल राहुलने पिटरसनला त्याच्यावर केलेल्या जुन्या ट्विटची आठवण करून दिली. या ट्विटमध्ये पिटरसनने केएल राहुलच्या फलंदाजीची तुलना भिंतीवरील सुकलेल्या रंगाशी केली होती.

भिंतीवरचा सुकलेला रंग पाहण्यापेक्षा हे चांगले असून याबाबत तू ट्विटही केले होते, असे केएल राहुल पिटरसनला म्हणतो. यावर पिटरसन आपल्याला असे काही शेअर केल्याचे आठवत नसल्याचे म्हणतो. मात्र राहुलच्या फलंदाजीत झालेला बदल पाहून आपण आनंदी असल्याचे तो म्हणाला. यावेळी राहुलने आपण खेळाच्या आधुनिक पद्धतीशी जुळवून घेतल्याचे सांगितले.

निवृती? इतक्यात नाही! निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम

गेल्या वर्षभरात मी व्हाईट-बॉल क्रिकेटवर मेहनत घेतली आहे. माझा खेळ सुधारण्यात अभिषेक नायरचेही मोठे योगदान आहे. व्हाईट बॉल क्रिकेट खेळताना मी माझा खेळ कसा उंचावू शकेल याबाबत अभिषेक नायर याच्याशी तासन्तास चर्चा केली. क्रिकेट आता बदलले असून मी चौकार-षटकार ठोकण्याचाही आनंद लुटत आहे. आता मी जास्त विचार करत नाही आणि चेंडू टप्प्यात पडला की फटका मारून खेळाचा आनंद लुटतो, असेही त्याने म्हटले.

मनोधैर्य उंचावले, आता विजयाचे ध्येय; बुमराच्या पुनरागमनाने मुंबईचे बळ वाढले