चेन्नई-मुंबई विमान प्रवासात 17 लाखांचे दागिने चोरीला

चेन्नई-मुंबई विमान प्रवासात पॅक केलेले सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. 17 लाखांचे दागिने चोरीप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार याची एक लॉजिस्टिक कंपनी आहे. मौल्यवान दागिने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवण्याचे काम त्याची कंपनी करते. त्याच्या कंपनीचे चेन्नई येथे कार्यालय आहे. त्या कार्यालयाची जबाबदारी एकाकडे सोपवण्यात आली आहे. गेल्या वर्षी चेन्नई येथील कार्यालयातून मुंबईला दागिने पाठवण्याबाबत एक बुकिंग करण्यात आले होते.