पहिली वासू परांजपे कप क्रिकेट स्पर्धा 7 एप्रिलपासून

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या वतीने 7 एप्रिलपासून माटुंग्याच्या मेजर रमेश दडकर मैदानात पहिल्या वासू परांजपे कप या 13 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण आठ संघांचा सहभाग असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येकी 35 षटकांच्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला तीन-तीन साखळी सामने खेळण्याची संधी मिळणार असून गटातील सर्वोत्तम संघ 11 एप्रिलला होणाऱया अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.