
घरासमोर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीशी सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला समता नगर पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. पीडित मुलगी ही कांदिवली परिसरात राहते. बुधवारी ती घराबाहेर खेळत होती. तेव्हा तेथे आरोपी आला. त्याने तिला जवळ बोलावून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यावर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या कृत्याने मुलगी घाबरली. तिने याची माहिती तिच्या आईला सांगितली. त्यानंतर तिच्या आईने समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.