गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची 42 लाखांची फसवणूक

शेअरमधील गुंतवणुकीच्या नावाखाली एकाने महिलेला एक कोटी 42 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

कांदिवली येथे राहणाऱ्या या महिला तक्रारदार गेल्या दहा वर्षांपासून शेअर ट्रेडिंग करत आहेत. फेब्रुवारीत त्यांना मोबाईलवर शेअर ट्रेडिंगबाबत एक लिंक आली. त्या लिंकच्या माध्यमातून त्या एका ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. आठवडाभर त्या या ग्रुपवरील गुंतवणुकीसंबंधातील संदेश वाचत होत्या. त्या संदेशांवर विश्वास ठेवून त्यांनी महिला अॅडमीनला मेसेज केला. तिने गुंतवणुकीसाठी पाठवलेल्या लिंकवर त्याने माहिती भरली.

यानंतर त्या अन्य व्हॉट्सअप ग्रुपवर जोडल्या जातील. मात्र त्यासाठी आणखी एक लिंकवर माहिती भरावी लागेल, असे सांगण्यात आले. ती लिंक क्लिक केल्यावर आणखी एका ग्रुपवर जोडल्या गेल्या. तसेच प्ले स्टोअरवरून त्याने एक अॅप डाऊनलोड केले. युझर नेम आणि पासवर्ड झाल्यावर त्यांना केवायसी करण्यास सांगण्यात आले.

त्यांना किती पैसे गुंतवणार अशी विचारणा केली गेली. त्याने शेअर खरेदी-विक्री करून नफा कसा कमवायचा असे त्या महिलेला विचारले. एक महिला ट्रेडिंगसाठी मदत करेल असे सांगितल्यावर त्याने सुरुवातीला 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. जी रक्कम गुंतवली जाईल, ती खात्यात दिसेल, असे त्यांना सांगितले. आज खरेदी केलेला स्टॉक दुसऱ्या दिवशी विक्री करायचा, प्रत्येक रक्कमेसाठी नवीन खाते दिले जाईल, असे त्यांना भासवले. त्यावर विश्वास ठेऊन एकूण 1 कोटी 42 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर त्यांनी पैसे काढण्यासाठी विनंती केली. ती विनंती फेटाळली गेली. जमा झाल्यावर नफ्यावर 5 टक्के कमिशन द्यावे लागेल असे त्यांना सांगण्यात आले. कमिशन म्हणून आणखी 19 लाख रुपये भरण्यास सांगितले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्याने उत्तर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.