
चॅटजीपीटीच्या नवीन क्षमतांबद्दल जागरूकता पसरत असताना त्याचा गैरवापरदेखील वाढत आहे. चॅटजीपीटीने बनावट आधार आणि पॅनकार्ड बनवले असल्याचा दावा करत काही वापरकर्त्यांनी ‘एक्स’वर फोटो शेअर केले आहेत. बनावट कागदपत्रांमधील फोटोचा अपवाद वगळता हे आधारकार्ड मूळ असल्याचा भास होतो. एका एक्स वापकर्त्याने टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचा फोटो हिंदुस्थानी ओळखपत्रावर योग्य क्यूआर कोड आणि आधार क्रमांकासह लावला आहे.