Mumbai Crime News – हत्यारे विकायला आलेली पाच जणांची टोळी जेरबंद

पिस्तुले आणि जिवंत काडतुसे विकण्यासाठी मुंबईत आलेल्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पकडले. अंधेरी येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी हे यूपी, बिहार व हरियाणा येथील असून त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि 21 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. अंधेरी पश्चिमेकडील एका हॉटेलमध्ये पाच जणांची टोळी आली असून त्यांच्याकडे पिस्तुले आणि जिवंत काडतुसे आहेत.