
पेस्ट कंट्रोलिंगच्या नावाखाली ठगाने महापालिकेच्या निवृत्त डॉक्टरची 16 लाखांची फसवणूक केली. डासांचा उच्छाद वाढल्याने इंटरनेटवर मिळालेल्या नंबरवर फोन केला असता एक महिला बोलू लागली. तिने पालिकेची कर्मचारी असल्याचे भासविले. तक्रारदाराने पेस्ट कंट्रोलबाबत विचारणा केली असता त्या महिलेने 50 रुपये भरून नोंदणी करावी लागेल, असे सांगितले. मात्र नोंदणीनंतर सेवा मोफत असेल असे सांगितले. बोलण्यात गुंतलेल्या असताना त्यांना एक मेसेज आला. खात्यातून 2 लाख 65 हजार रुपये काढले.