
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममध्ये प्रेमसंबंधाच्या वादातून हत्या केल्याची धक्कायक घटना घडली. मुलीच्या घरच्यांनी लग्नासाठी 1 वर्ष थांबण्यास सांगितल्याने तरूणाला राग आला. याच रागातून त्याने प्रेयसीला आणि तिच्या आईला भोसकलं, यात दिपीकाच्या आईचा मृत्यू झाला असून दिपीकची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नविन असे त्या आरोपीचे नाव आहे. तर दिपीका (20) असे त्याच्या मृत प्रेयसीचे नाव असून लक्ष्मी (43) असे तिच्या आईचे नाव आहे. नविन आणि दिपीका यांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे नविनला दिपीकासोबत लग्न करून संसार थाटायचा होता. मात्र दिपीकाचे वडील या लग्नाला तयार नव्हते. नविनचे वागणे, बोलणे त्यांना पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी नविनला आणखी एक वर्ष वाट पाहण्याचा सल्ला दिला होता.
दिपीकाच्या वडिलांनी दिलेल्या या सल्ल्यामुळे नविनला राग अनावर झाला. याच रागात नविन धारदार सुरा घेऊन दिपीकाच्या घरी पोहोचला आणि त्याने दिपीकाला चाकूने भोसकले. यावेळी दिपीकाची आई लक्ष्मी तिला वाचवण्याठी मधे आली म्हणून नविनने तिच्या आईवरही चाकूने वार केले. या हल्ल्यात लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला तर दिपीका गंभीर जखमी झाली. चाकू हल्ल्यानंतर नविनने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान शेजारच्यांना जेव्हा आरडाओराडा केल्याचा आवाज आला तेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेचच दिपीकाला आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी दिपीकाच्या आईला मृत घोषित केले तर दिपीकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. आणि लगेचच आरोपीचा शोध सुरू करून श्रीकाकूलम जिल्ह्यातून त्याला अटक केली.