आपण कधी सुधारणार? रेल्वेच्या एसी कोचमध्ये पाय पसरून झोपलेल्या महिलेला प्रवाशाने सुनावले

 

हिंदुस्थानी रेल्वेने प्रवास करताना अनेकदा लोकांना आपण सरकारी गाडीने प्रवास करत असल्याचे भान राहत नाही. अशावेळी ते मनाला वाटेल त्या गोष्टी करत असतात. मात्र आपल्यामुळे गाडीतील इतरांना त्रास होतोय याची जाणीव देखील त्य़ांना नसते. असाच एक अनुभव एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि लोकांच्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.

रवि असे या X वापरकर्त्याचे नाव आहे. रविने आपल्या रेल्वे प्रवासातील एक अनुभव आणि वास्तव शेअर केले आहे. त्याने एक फोटो शेअर केलाय. यामध्ये एक महिला रेल्वेच्या एसी कोटमधील तीन सीट्सवर अक्षरश: पाय पसरून झोपताना दिसत आहे. यासोबतच त्या महिलेचे सामानही विखूरलेल्या अवस्थेत दिसत आहे. रविने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत, लोकांच्या नागरी जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

जेव्हा आपण सरकरी गाडीने प्रवास करतो, तेव्हा आपण इतर प्रवाशांचाही विचार करायचा असतो. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ना, याची जाणीव असणे गरजेचे असते. समाजात आणि सार्वजनिक ठिकाणी संवेदनशील आणि जबाबदारीने जगणे गरजेचे असते, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, युजर्सनी त्या महिलेवर टीका करायला सुरूवात केली आहे.

सार्वजनिक ठिकाणे किंवा सरकारी मालमत्तेला आपले समजू नये असे म्हणत लोक त्या महिलेवर तिच्या शिस्तीच्या अभावाबद्दल टीका करत आहेत.