
गेल्या दोन्ही सामन्यात दिमाखदार विजयाची नोंद करणारा बंगळुरूचा संघ बुधवारी गुजरातला आपल्या घरच्या मैदानावर दणका देण्यासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरूने सलामीच्या सामन्यात कोलकात्यावर मात केली होती तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा धुव्वा उडवत आयपीएलची सुरूवात जोरदार केली आहे. आतापर्यंत विराट कोहली, फिल सॉल्ट आणि रजत पाटीदारने अर्धशतकी खेळी केल्या आहेत तर गोलंदाजीत जॉश हेझलवूडने प्रभावी मारा केला आहे. दुसरीकडे गुजरातला एक पराभव तर एका विजयाची नोंद करता आली आहे.