
सांताक्रुझ पूर्व येथील एअर इंडिया मैदानावर शुक्रवारपासून आंतरविधानसभा सुप्रिमो चषकाचा थरार रंगणार आहे. टेनिस क्रिकेटच्या या तीनदिवसीय स्पर्धेत कलिना विधानसभेतील 16 संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. नुकत्याच या संघांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप’ अशी ख्याती असलेल्या ‘सुप्रिमो चषका’चे काऊंटडाऊन सुरू झाले असून खुल्या गटातील स्पर्धा 9 ते 13 एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी 7 वाजता सांताक्रुझ पूर्व येथील एअर इंडिया मैदानावर रंगणार आहे. यात मुंबईसह देशाच्या कानाकोपऱ्यातील संघ सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी याच मैदानावर कलिना विधानसभेतील क्रिकेटपटूंसाठी आंतरविधानसभा सुप्रिमो चषकाचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून विजेत्या संघांला अनुक्रमे सवा लाख रुपये आणि उप विजेत्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
कलिना विधानसभा क्षेत्रातील होतकरू क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सुप्रिमो चषकातील खुल्या गटातील सामन्याच्या धर्तीवरच ही आंतरविधानसभा स्पर्धा गेल्या 11 वर्षांपासून भरवली जाते.
n संजय पोतनीस, आयोजक-आमदार
n आंतरविधानसभा सुप्रिमो चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गेल्या अनेक वर्षांपासून वायएनसीसी आणि डी.एम.आर. या दोन्ही संघामध्ये विजेतेपदासाठी चुरशीचा सामना रंगला आहे. यंदाही या दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर धडकणार का, याबाबत क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यांच्यात रंगणार सामना
शुक्रवार, सकाळी 9 वाजता
युवा विरुद्ध रफ ऍण्ड टफ
सकाळी 10.30 वाजता
कोकण पॅकर्स विरुद्ध लिटिल मास्टर
सकाळी 11.30 वाजता वायएनसीसी विरुद्ध अष्टविनायक
दुपारी 12.30 वाजता
कुर्ला स्ट्राईकर विरुद्ध बीकेसी बॉईज
शनिवार
सकाळी 9 वाजता
श्री स्वामी समर्थ विरुद्ध अमेय इंडियन
सकाळी 10.30 वाजता
एम.बी. फ्रेंडस विरुद्ध कलिना इलेव्हन
सकाळी 11.30 वाजता
डी.एम.आर विरुद्ध मराठा पॅकर्स
सकाळी 12.30 वाजता
टी. के. इलेव्हन विरुद्ध कापडिया नगर