सीबीएसईचा कौशल्य आधारित शिक्षणावर भर; पर्यायी विषयांनुसार पास होण्याची संधी

कौशल्य आधारित शिक्षणावर भर देत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. तसेच हिंदीला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून इंग्रजी भाषेला हिंदीचा पर्याय देण्यात आला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना तीन कौशल्य आधारित विषयांपैकी एकाची निवड करावी लागेल. कम्प्युटर ऑप्लिकेशन्स, आयटी किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असे तीन विषय असतील. नववी-दहावीत इंग्रजी आणि हिंदी या दोनपैकी एकाची भाषा विषय म्हणून निवड करावी लागेल. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र किंवा भाषा या मुख्य विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास कौशल्य आधारित विषय किंवा पर्याय म्हणून निवडलेले विषय गृहीत धरून त्यांचा अंतिम निकाल ठरवला जाईल. थोडक्यात विद्यार्थ्यांना या विषयांमधील गुणांच्या आधारे उत्तीर्ण होता येईल.

बारावीच्या विद्यार्थ्यांना लॅण्ड ट्रान्सपोर्टेशन असोसिएट, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड हार्डवेअर, फिजिकल ऑक्टिव्हिटी ट्रेनर आणि डिझाईन थिंकिंग अॅण्ड इनोव्हेशन या चार नव्या काwशल्याधारित विषयांचा पर्याय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याकरिता या विषयांचा पर्याय देण्यात आला आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात भाषा, मानव्य, गणित, विज्ञान, कौशल्याधारित विषय, सामान्य ज्ञान आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या सात विषयांवर भर असेल. अभ्यासक्रमातील बदलाबरोबरच सीबीएसईने दहावी-बारावीच्या ग्रेडिंग सिस्टीममध्येही बदल केला आहे. आता 9 पॉइंड ग्रेडिंग सिस्टीम असेल. त्यानुसार गुणबदल केला जाईल. याशिवाय दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा देण्याची संधी मिळेल. त्यापैकी एक फेब्रुवारीत तर दुसरी एप्रिलमध्ये असेल.

बेसिक पॅलक्युलेटरच्या वापरास परवानगी

चालू शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या अकाउंटन्सी परीक्षेत बेसिक पॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. अर्थात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि टक्केवारी गणना या मूलभूत गणिती क्रियांकरिताच पॅल्क्युलेटर वापरता येईल. गणितातील प्रगत किंवा प्रोग्राम करण्यायोग्य पॅलक्युलेटरचा वापर करता येणार नाही. विद्यार्थ्यांचा कॉग्निटिव्ह ताण कमी करणे, विश्लेषणात्मक कौशल्याला वाव देणे आणि जागतिक शैक्षणिक मानकाशी जुळवून घेण्याकरिता राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून हे बदल करण्यात आले आहेत.

इतर बदल

z काही विषयांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ऑन-स्क्रीन मार्किंग

z 2025पासून सुधारित पुनर्मूल्यांकनाला मान्यता