
शहरातील द्वारकानगरीमधील मनीषा बिडवे या महिलेच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा या खुनाशी संबंध नसून पैशाची मागणी तसेच अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी गोपनीय साक्षीदाराच्या जबानीवरून तपासाची चक्रे फिरवली आणि रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या दोघांना ताब्यात घेतले.