
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत राडा प्रकरणी दोघांना कुरार पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. आठ ते नऊ आरोपींचा सहभाग असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
रविवारी मालाड पूर्वच्या पुरार परिसरात गुढीपाडवानिमित्त मिरवणूक आयोजित केली होती. तेव्हा दोन गटांत वाद होण्यास सुरुवात झाली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. आठ जणांवर दुसऱ्या गटातील लोकांनी हल्ला केला. या घटनेची माहिती समजताच पुरार पोलीस घटनास्थळी आले. जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केले. घडल्या प्रकरणी पुरार पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तपास करून रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.