Myanmar Earthquake म्यानमार भूकंपबळींचा आकडा 2700 वर

म्यानमारमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपातील बळींचा आकडा 2 हजार 700 वर गेला आहे. हा आकडा 3 हजारावर जाईल असा अंदाज म्यानमार सरकारने व्यक्त केला आहे. तर जखमींची संख्या 4 हजार 500 वर गेली आहे. तसेच 441 जण बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारने 7 दिवसांच्या राष्ट्रीय दुखवटयाची घोषणा केली आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 6 एप्रिल रोजी देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्धे उतरवण्यात येणार आहेत. दरम्यान, आज हिंदुस्थानी नौदलाच्या युद्धनौका आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्रीमधून जवळपास 40 टन जीवनावश्यक वस्तू आणि इतर सामग्री भूकंपग्रस्तांसाठी पोहोचवण्यात आली.