ब्लॅकमेल करून महिलेकडे मागितली खंडणी, शाहू नगर पोलिसात गुन्हा नोंद

महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळले. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

तक्रारदार महिला या धारावी परिसरात राहते. गेल्या आठवड्यात ती घरी होती तेव्हा तिला एकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेसेज केला. तिच्या लहान बहिणीचे अश्लील व्हिडीओ असल्याचा दावा केला. ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. एकाने महिलेला मोबाईलवर क्यूआर कोड पाठवून पैसे पाठवण्यास सांगितले.

बदनामी नको म्हणून महिलेले काही पैसे दिले. पैसे दिल्यानंतर एकजण सतत पैशाची मागणी करत होता. महिलेने पैसे देण्यास नकार दिला. घडल्याप्रकरणी महिलेने शाहूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.