
महाराष्ट्रातून गोळा होणाऱ्या 100 रुपयांपैकी फक्त 7 रुपये राज्याला परत मिळतात, हा मोठा अन्याय आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर केली आहे.
राज्यसभात बोलताना प्रियांका चतुर्वेदी म्हणालाय की, “राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि दारिद्र्य वाढत असताना आवश्यक निधी मिळत नाही. महिलांना निवडणुकीपूर्वी 2100 रुपये देण्याचे आश्वासन हवेत विरले. केंद्राचा सेस आणि अधिभार 2.25 लाख कोटींवर गेला, पण राज्यांना त्याचा लाभ नाही. सीएजी (CAG) अहवालातही या निधीच्या गैरवापरावर चिंता व्यक्त झाली आहे. हा निधी डिव्हिसिबल पूलमध्ये आणावा किंवा त्यावर पारदर्शकता ठेवावी. महाराष्ट्रासह सर्व राज्यांना न्याय मिळालाच पाहिजे.”