
इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सामना रंगला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या लढतीत लखनऊने यजमान संघावर 5 विकेट्सने विजय मिळवला. यात महत्त्वाचा वाटा उचलला तो वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने. त्याने 4 विकेट घेत हैदराबादच्या फलंदाजीला वेसण घातले. या कामगिरीबद्दल त्याचा सामनावीर पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला.
आयपीएलचा हंगाम सुरू होण्याधी हैदराबादने 300 धावा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा संघ जवळपास या लक्ष्यापर्यंत पोहोचलाही होता. त्या लढतीत हैदराबाद 286 धावा चोपल्या होत्या. त्यामुळे कमकुवत गोलंदाजी असलेल्या लखनऊला हैदराबादचे फलंदाज झोडपून काढणार आणि 300 धावा करणार असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र लिलावामध्ये अनसोल्ड राहिलेला आणि अचानक लखनऊच्या संघात एन्ट्री झालेल्या पालघर एक्सप्रेस शार्दुल ठाकूरने हैदराबादच्या फलंदाजांना वेसण घातले.
हे वाचा – विराट कोहलीला न विचारताच त्याची बॅग उघडली, परफ्यूमही वापरला; चिकाराच्या वर्तनानं RCB चे खेळाडू हैराण
शार्दुल ठाकूरने तिसऱ्याच षटकामध्ये एका मागोमाग एक चेंडूवर अभिषेक शर्मा आणि ईशान किशान यांना पवेलियानचा रस्ता दाखवला. त्यानंतर मधल्या फळीतील अभिनव मनोहर आणि तळाचा फलंदाज मोहम्मद शमी यालाही बाद करत शार्दुलने 4 षटकात 34 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
यानंतर सोशल मीडियावर शार्दुल ठाकूरला पाठिंबा देणारे अनेक पोस्ट पडू लागल्या. लॉर्ड शार्दुल ठाकूर, नाव लक्षात ठेवा… लॉर्ड शार्दुल ठाकूरचे कमबॅक… शार्दुल ठाकूर हिरो आहे… अशा आशयाच्या पोस्ट नेटकऱ्यांनी शेअर केल्या.
God is Kind. ♥️
Shardul Thakur the hero. pic.twitter.com/Qug2LwhkLg— mufaddla parody (@mufaddl_parody) March 27, 2025
Lord Shardul Thakur is back
Reminded me of this edit pic.twitter.com/uQffC7San4
— Middle Class Chandler (@MC_Chandler01) March 27, 2025
Lord Shardul Thakur, remember the name!! pic.twitter.com/tRJD5aqDt8
— Hustler (@HustlerCSK) March 27, 2025
दरम्यान, शार्दुल ठाकूरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनऊने हैदराबादला दोनशेच्या आतच रोखत सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर 191 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनऊला मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच षटकात एडन मार्करमच्या रूपाने धक्का दिला, पण ही विकेट हैदराबादला फारशी मानवली नाही. कारण त्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरनने अवघ्या 50 चेंडूंच्या खेळीत 8 षटकार आणि 11 चौकारांची बरसात करत 116 धावांची भागी रचत संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला. पूरनने 18 चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. तो वेगवान शतकाच्या दिशेने झेपावत असताना त्याचा झंझावात 26 चेंडूंत 70 धावा करून शांत झाला. त्याने या खेळीत 6 षटकार आणि 6 चौकार लगावले. मग मार्शनेही 52 धावांची खेळी केली. दोघे बाद झाल्यावर आयुष बदोनी (6) आणि ऋषभ पंतही (15) बाद झाले, पण अब्दुल समदने 8 चेंडूंतच 22 धावा चोपत लखनऊच्या पहिल्या विजयावर 23 चेंडू आधीच शिक्कामोर्तब केले.