
पंधरावी विधानसभा स्थापन होऊन जवळपास चार महिने उलटल्यानंतरही राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांच्या स्थापनेला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर बुधवारी रात्री उशिरा या समित्यांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. विधिमंडळ समित्यांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी लोकलेखा समिती काँग्रेसला मिळाले असून समितीचे प्रमुख म्हणून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.