आधी देशाच्या सीमा मजबूत करा, शिवसेनेची जोरदार मागणी

सरकारने स्वातंत्र्यपूर्व काळातले चार कायदे बदलून नवा इमिग्रेशन फॉरेन अॅक्ट आणला. ही चांगली बाब आहे. मात्र, वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा सरकारने देशाच्या सीमा अधिक मजबूत कराव्यात, अशी जोरदार मागणी आज शिवसेनेने   केली.

लोकसभेत इमिगेशन व फारेन अॅक्टवरील चर्चेत सहभागी होताना शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी देशाच्या सीमा मजबूत करा, अशी आग्रही मागणी केली.

चार कायदे बदलून एकच कायदा आणला. इमिग्रेशन व फॉरेन अॅक्ट् केला. त्यात परिचय तीनमध्ये इमिग्रेशन ऑफिसरला सगळे अधिकार दिले आहेत. हेड कॉन्स्टेबलला अधिकार आहेत. वैयक्तीक अधिकार दिल्याने या अधिकाऱ्यांच्या वर्तनानुसार  पक्षपातीपणा होऊ शकतो. अतिथी देवो भव, अशी आपली परंपरा आहे. त्या परंपरेलाही गालबोट लागू शकते. विदेशातून अनेकजण वैद्यकीय, उपचारासाठी, शिक्षणासाठी आपल्या देशात येत असतात. या कायद्यान्वये काही अधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिल्याने त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. शेवटी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पटलावर चांगली असायला हवी, असे  अनिल देसाई म्हणाले.