
ब्रिटीश-हिंदुस्थानी चित्रपट निर्माती संध्या सुरी यांचा ‘संतोष’ या हा चित्रपट युकेने ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला होता. ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्येही त्याचा समावेश झाला होता. मात्र हिंदुस्थानात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी) बंदी घातली आहे. सेन्सॉर बोर्डान चित्रपटातील काही संवेदनशील दृष्यांना आक्षेप घेतला असून त्यात मोठया प्रमाणात कट्सची मागणी केली आहे.