
नियामक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा बँका एचडीएफसी आणि पंजाब अँड सिंध बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसी नियमांचे पालन न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला 75 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तर पंजाब अँड सिंध बँकेला मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आणि आर्थिक समावेशन मार्गदर्शक तत्त्वांची माहिती न दिल्याबद्दल 68 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.