
आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी ओपनएआयचा चॅटबॉट असलेले चॅटजीपीटी जगभरात लोकप्रिय होत आहे. चॅटजीपीटीअंतर्गत नवनवीन फिचर किंवा टुल्स आणले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून चॅटजीपीटीवर अत्यंत प्रगत असे इमेज जनरेटर टुल सुरू झाले आहे. ‘40 इमेज जनरेशन’ असे या टुलचे नाव आहे. याच टुलचा वापर करून हटके प्रतिमा तयार करता येतात. येत्या काळात अशाच प्रतिमांचा सोशल मीडियावर धुमाकूळ दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
‘40 इमेज जनरेशन’ या नव्या टुलच्या सहाय्याने जपानी स्टुडिओ शैली म्हणजे स्टुडिओ ‘गिबली’च्या रंगीबेरंगी ऑनिमेशन शैलीच्या प्रतिमा तयार करता येतात. ओपन एआयचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष सॅम अल्टमन यांनी नव्या अपडेशनची घोषणा करतानाच स्वतःचा ‘एक्स’वरील प्रोफाईल पह्टोची गिबली स्टुडिओ इमेज तयार केली. चॅटजीपीटीच्या नव्या टुलचा वापर करण्यासाठी ते आधी डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी चॅटजीपीटी डॉट कॉमवर जाऊन लॉगइन करावे लागले. एआयअंतर्गत जीपीटी-40 हा पर्याय निवडून ते डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड झाल्यानंतर एक-एक फोटो निवडून आपण गिबली स्टुडिओ इमेज तयार करू शकतो. ओपन एआय तंत्रज्ञानाची ही एक मोठी तांत्रिक झेप मानली जात आहे.
सुरुवातील 40 इमेज जनरेशन टुल युजर्ससाठी फ्री असेल असे सुरुवातील सांगितले होते. मात्र सॅम अल्टमन यांच्या मते त्यासाठी युसर्ससाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.