
इजिप्तच्या लाल समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेच सहाहून अधिक जणांचा मृत्यू आणि 9 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची शक्यता आहे. पाणबुडीत एकून 44 प्रवासी प्रवास करत होते.
सदर घटना गुरुवारी (27 मार्च 2025) सकाळच्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे. सिंदबाद नावाची पर्यटन पाणबुडी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांना पाण्याखालील जग दाखवण्याचे काम करत आहे. अशाच 44 पर्यटकांना घेऊन इजिप्तच्या लाल समुद्रात प्रवाळ खडक आणि उष्णकटिबंधीय माशांच जग पाहण्यासाठी ही पाणबुडी 72 फूट खोल गेली होती. याच दरम्यान पाणबुडी बुडाल्याची घटना घडली, पाणबुडी बुडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत सहाहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 29 जणांना वाचवण्यात यश आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. BBC ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.