
एका रियालिटी शो दरम्यान अंकिताने केलेल्या फोटोशुटचे फोटो तीने तीच्या सोशल हॅंडलवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिताचं रुप बहरुन आलेलं दिसत आहे. या फोटोंच चाहत्यांकडून देखील कौतुक होत आहे. या फोटोंमध्ये अंकिताने मस्टर्ड गोल्ड कलर असलेली रेडी टू वेअर साडी परिधान केली आहे. त्या साडीवर शोभतील असे गोल्डन इअरिंग घातले आहेत. तसेच या लूक ला पुर्ण करण्यासाठी मस्टर्ड कलरच्या हाय हिल्स घातल्या आहेत. या फोटोंमध्ये अंकिताचा अॅटीट्यूड अंदाज दिसून येत आहे.