
कृतज्ञता व्यक्त करणं हे सुंदर मनाचं लक्षण आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री सारा अली खान हिने एका घडलेल्या घटनेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये साराने तिचे वडिल सैफ अली खान बरे झाले आहेत आणि आता सर्वकाही ठिक असल्याचे तिने म्हटले आहे. घडलेल्या घटनेमुळे ती कृतज्ञ असल्याचेही तिने अगदी स्पष्टपणे कबूल केले आहे.
साराने सैफ अली खान वर झालेल्या चाकूहल्ल्याबाबत उघडपणे पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. माध्यमांसमोर या आधी कधीही साराने तिच्या वडिलांबद्दल आणि झालेल्या घटनेबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आयुष्य हे खूप अनिश्चित आहे, त्या रात्री काही झालं असतं तर असं म्हणत साराने घडलेल्या घटनेविषयी भाष्य केले. एखाद्याचं आयुष्य एका रात्रीत कसं बदलू शकतं असंही यावर अधिक बोलताना सारा म्हणाली होती. सारा म्हणाली की, या घटनेने तिला जीवनातील अनिश्चिततेची जाणीव करून दिली. सारा म्हणाली की, यातून वडिलांची सुखरुपपणे सुटका झाल्यामुळेच आमचे संपूर्ण कुटुंब कृतज्ञ आहे.
या घटनेने कुटुंब जवळ आले का असे मुलाखतीमध्ये विचारले असता, सारा म्हणाली, “ते माझे वडील आहेत, त्यामुळे मला हे जाणवले की जीवन एका रात्रीत बदलू शकते. म्हणून प्रत्येक दिवस जाणीवपूर्वक साजरा करायला हवा. त्यामुळे मला फक्त कृतज्ञ राहण्याची जाणीव झाली.”
या वर्षी 16 जानेवारीला पहाटे मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी सैफवर हल्ला झाला. हल्लेखोराने त्याच्यावर सहा वेळा चाकूने वार केले. वार करणाऱ्याला नंतर अटक करण्यात आली. अभिनेत्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि लीलावती रुग्णालयात त्याच्या पाठीच्या कण्यावरील आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
साराला अलीकडेच अक्षय कुमार, वीर पहारिया आणि निमरत कौर यांच्यासोबत स्काय फोर्समध्ये पाहिले गेले. ती पुढील चित्रपट अनुराग बसूच्या मेट्रो इन डिनोमध्ये काम करणार आहे. यात अनुपम खेर, कोंकणा सेन, नीना गुप्ता, अली फजल, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी आणि आदित्य रॉय कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ४ जुलैला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.