संभलमध्ये घरांच्या छतावर नमाजाला बंदी

येथे घरांच्या छतावर, रस्त्यावर नमाजाला बंदी घालण्यात आली आहे. कोतवाली येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी याबाबतचे निर्देश दिले. मशीद तसेच दर्ग्याच्या आत नमाज अदा करण्यासाठी परवानगी असेल. येथे सर्व सण साजरे केले जातील. कुठेही अशांतता दिसणार नाही. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. पोलीस निष्पक्ष काम करत असून कुठल्याही प्रकारची दुर्घटना किंवा परिसरात हिंसाचार घडू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.