
हमासविरोधात येथे पहिल्यांदा जोरदार आंदोलन करण्यात आले. हजारो लोक रस्त्यावर उतरले. हमास एक दहशतवादी संघटना असून त्यांनी सत्ता सोडावी अशी मागणी पॅलेस्टिनींनी लावून धरली. हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे येथील नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. हमास निघू जा, ही एक दहशतवादी संघटना आहे, दहशतवाद मुळासकट उखडून टाका, अशी घोषणाबाजी नागरिकांनी केली. यावेळी सशस्त्र दहशतवाद्यांनी लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली, याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, इस्रायलने आजही गाझातील अनेक भाग रिकामा केला.