प्रधानमंत्री आवास योजनेला पैसे कमी पडणार नाहीत

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलासाठी पैसे कमी पडणार नाहीत. हप्ता वेळेत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. हप्ता देण्यास दिरंगाई अथवा टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी विधानसभेत दिले.

अमरावती जिह्यात सन 2024- 2025 या वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेतील (टप्पा – 2) लाभार्थ्यांना योजनेतील अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी दर्यापूर विधानसभेचे शिवसेना आमदार गजानन लवटे यांनी  तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मागणी केली. त्यावर, घरकुलाकरिता कुठल्याही परिस्थितीत पैसे कमी पडणार नाहीत, हप्ता वेळेत कुणी देत नसेल आणि कोणी लाभार्थीची अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याला सोडलं जाणार नाही. त्याचबरोबर लाभार्थ्यांना उपद्रव होईल असं कुठलंही कृत्य कोणालाही करता येणार नाही. घर पूर्ण करण्यासाठी जी शक्य ती सगळी मदत करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी दिले.