हिंदुस्थानी मच्छीमाराची पाकिस्तानात आत्महत्या

पाकिस्तानच्या कराची येथील मलीर तुरुंगात खितपत पडलेल्या हिंदुस्थानातील एका मच्छीमाराने मंगळवारी आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सुमारे 53 वर्षांच्या मच्छीमाराला 2022 मध्ये पाकिस्तानच्या मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने अटक केली होती. त्याच वर्षी त्याची शिक्षाही पूर्ण झाली होती. मात्र, शिक्षा भोगूनही सुटकेचा मार्ग न दिसल्याने नैराश्य येऊन त्याने तुरुंगातच आत्महत्या केल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी दिली.