
अमेरिकेतील एका रिक्रूटर कंपनीचा सॉफ्टवेअर कंपनीच्या निवड प्रक्रियेशी संबंधित गोपनीय माहिती असलेला ई-मेल लीक झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. या ई-मेमधून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या कंपनीच्या अंतर्गत धोरणानुसार इन्फोसिस, विप्रो, टीसीएससारख्या बडय़ा आयटी कंपन्यांत काम केलेल्यांना नोकरीवर घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या निवडीबाबतच्या या गोपनीय निकषांमध्ये नॉन अमेरिकाRना नो एंट्री असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, एमआयटी, स्टॅनफर्ड, यूसी बर्कले, कॅलटेक, वॉटरलू यांसारख्या नामांकित विद्यापीठांतील पदवीधरांनाच प्राधान्य दिले जावे, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यातही उमेदवाराने कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर (मास्टर्स) केले असेल तरच प्राधान्य दिले जाईल.
इतर विद्यापीठातील पदवीधराचा जीपीए केवळ 4 असेल तरच अपवाद केला जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. या अमेरिकी कंपनीने नो व्हिसा स्पॉन्सरशीप धोरण अवलंबल्याने केवळ अमेरिकी नागरिक आणि कॅनेडीयन उमेदवारांनाच नोकरीचे दरवाजे खुले राहणार आहेत.
वारंवार नोकऱ्या बदलणाऱयांनाही दरवाजे बंद
निवड केल्या जाणाऱ्या उमेदवाराकडे 4 ते 10 वर्षांच्या सॉफ्टवेअरचा अनुभव असणे गरजेचे आहे. याशिवाय आधुनिक जावास्क्रिप्ट (टाइपस्क्रिप्ट, नोडजेएस, रिअॅक्टजेएस) आणि एआय, एलएलएममध्ये प्रावीण्य असायला हवे. काही मोठय़ा कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी कधी छोटय़ा कंपन्यांत काम केले आहे तेही निवड होण्यास पात्र नाहीत. या यादीमध्ये इंटेल, सिस्को, एचपी, टीसीएस, टाटा, महिंद्रा, इन्फोसिस, क@पजेमिनी, डेल, कॉग्निजेंट आणि विप्रोचा समावेश आहे. याशिवाय सतत नोकऱ्या बदलणाऱ्या उमेदवारांनाही या कंपनीत प्रवेश नसेल.