कोस्टल रोडलगतची मोकळी जागा बिल्डर्सच्या घशात घालू देणार नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आता उघड होत आहे. मुंबईतील अनेक मोक्याच्या जागा भाजप बिल्डर आणि दलालांना आंदण देत आहे. मुंबई लुटण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईतील कोस्टल रोडलगतच्या मोकळ्या आणि मोक्याच्या जागांवर बिल्डरांचा डोळा आहे. तसेच मुंबईची लूट करणारे सत्ताधारी त्यांचे बिल्डर, कंत्राटदार, दलाल मित्रांसाठी काम करत आहेत. मुंबईतील मोक्याचा जागा आम्ही बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही मुंबईसाठी असलेल्या आणि नियोजन केलेल्या जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. मुंबईतील कोस्टल रोडलगतची मोकळ्या जागांवर बिल्डरांचा डोळा आहे. त्या जागा मिळवण्यासाठी त्यांचे दलाल प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही मुंबईकर या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात कधीही जाऊ देणार नाही. मुंबईकर या जागा बिल्डरांना कधीही देणार नाहीत! ही जमीन आमची आहे- मुंबईकरांची, ती बिल्डर्सच्या दलालांना देण्यासाठी नाही. शहरातील मोकळ्या जागा मुंबई महापालिकेकडेच असायल्या हव्या. त्याचा वापर शहरात वृक्षारोपणासाठी करण्यात यावा. याबाबतचे नियोजन आम्ही मुंबईकरांनी केले आहे. आम्ही सरकारला या जागा बिल्डर्सच्या घशात घालू देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे.